Dipa Karmakar: बंदीनंतर पुनरागमन करत दीपाची ऐतिहासिक कामगिरी, 'असा' पराक्रम करणारी पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट

Gymnastic: भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने 21 महिन्यांच्या बंदीनंतर सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे.
Dipa Karmakar
Dipa KarmakarSakal
Updated on

Dipa Karmakar: भारताच्या अनेक क्रीडापटूंनी आत्तापर्यंत मोठमोठे कारनामे केले आहेत. पण जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं नाव गाजवत आहे ते दीपा कर्माकरने. तिने नुकताच मोठा इतिहास घडवला आहे.

तिने ताश्कंद येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा कारनामा केला. ती या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिलीवहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली.

Dipa Karmakar
Mitchell Starc KKR vs SRH : माझं करियर संपत आलं तरी मी पुन्हा येईन... 24 करोड किंमतीच्या खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

यापूर्वी 2015 मध्ये दीपाला याच स्पर्धेत ब्राँझपदक मिळाले होते. यानंतर आत तिने सुवर्ण कामगिरी नोंदवली आहे. तिने सुवर्णपदक जिंकताना सरासरी 13.566 गुण अशी कामगिरी केली.

दक्षिण कोरियाच्या किम सून ह्यंग हिला रौप्य (13.466), तर ज्यो क्योंग बीयोल हिला ब्राँझपदक (12.966) मिळाले.

दरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे दीपावर 21 महिन्यांची बंदीची कारवाई झालेली होती. पण त्यानंतर तिने आता शानदार पुनरागमन केले आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.

तिच्या या कामगिरीसाठी तिचे सध्या देशभरातून कौतुक होत आहे.

Dipa Karmakar
KKR vs SRH IPL 2024 Final : पॅट कमिन्सने स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड... 'या' 4 कारणांमुळे काव्या मारन ढसाढसा रडली

दीपाने घडवलाय इतिहास

दीपा 2016 साली ऑलिंपिकमध्ये सामील होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. रिओला झालेल्या या ऑलिंपिक स्पर्धेत ती चौथ्या क्रमांकावर राहिली होती. पदक हुकले असले तरी तिच्या या कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली होती.

इतकेच नाही, तर तिने 2014 राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकले होते. त्यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. ती एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये 2018 साली सुवर्णपदक जिंकणारीही पहिली भारतीय होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com