
नागपूर : बुद्धिबळाच्या विश्वात ‘वंडरगर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखने सोमवारी बातुमी (जॉर्जिया) येथे संपलेल्या महिलांच्या विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील फायनलमध्ये भारताच्याच कोनेरू हंपीचे आव्हान मोडीत काढून जगज्जेती होण्याचा बहुमान पटकावला.