
नवी दिल्ली : महिला बुद्धिबळातील महान खेळाडू सुसान पोल्गर यांनी भारताची विश्वविजेती खेळाडू दिव्या देशमुख हिचे कौतुक केले. दिव्याने मानसिक कणखरता व जिंकण्याची इच्छाशक्ती याच जोरावर विश्वविजेतेपद पटकावले, अशा शब्दांत पोल्गर यांनी दिव्याच्या संस्मरणीय यशाची स्तुती केली.