Chess World Cup: मराठमोळी दिव्या अंतिम फेरीत; बुद्धीबळ विश्वकरंडक, १०१ चालींमध्ये चीनच्या खेळाडूला नमवले
Divya Deshmukh: महाराष्ट्राच्या १९ वर्षीय दिव्या देशमुख हिने बुद्धीबळाच्या विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने चीनच्या टॅन झोनग्यी हिच्यावर १.५-०.५ अशा फरकाने विजय मिळवला.
नवी दिल्ली : महाराष्ट्राची १९ वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख हिने बुद्धीबळाच्या पटावर दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि महिला बुद्धीबळ विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.