FIDE Women’s World Chess Championship tiebreak match: महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामना नागपूरच्या दिव्या देशमुखने विजेतेपद मिळवलं आहे. त्यानंतर सर्वत्र तिचं कौतुकं होतं आहे. मात्र, तिच्या करियरसाठी तिच्या आईने चक्क स्वत:च्या करिअरवर पाणी फेरलं आहे. खरं तर मुलांसाठी आई-वडिलांनी त्याग केल्याची शेकडो उदाहरणे आपल्या देशात आढळतात, यात आता दिव्या देशमुखच्या कुटुंबाचीही भर पडली आहे.