Divya Deshmukh: विश्वकरंडक विजेतेपद पटकावणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार
CM Devendra Fadnavis: जॉर्जियामधील महिलांच्या बुद्धिबळ विश्वचषक विजेतेपद प्राप्त दिव्या देशमुखचा महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. नागपूरच्या कविवर्य सुरेश भट सभागृहात शनिवारी सकाळी हा कार्यक्रम होईल.
नागपूर : बातुमी (जॉर्जिया) येथे झालेल्या महिलांच्या विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या दिव्या देशमुखचा उद्या, शनिवारी महाराष्ट्र शासनातर्फे नागरी सत्कार करण्यात येणार आहे.