Divya Deshmukh: तरुणाईने बुद्धिबळात करिअर करावे; दिव्या देशमुख, भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल नागपूरकरांना दिले धन्यवाद
Chess Champion: जॉर्जियामधील विश्वकरंडक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवून नागपूरच्या दिव्या देशमुखने भारताचा तिरंगा फडकावला. तरुणांनी बुद्धिबळात करिअर करावे, असे आवाहन दिव्याने पत्रकार परिषदेत केले.
नागपूर : माझ्या ‘वर्ल्डकप’मधील कामगिरीनंतर बुद्धिबळाला आता नागपूर व महाराष्ट्रात निश्चितच बूस्ट मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुला-मुलींनी या खेळात करिअर करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ‘वर्ल्ड चॅम्पियन’ दिव्या देशमुखने पत्रकार परिषदेत केले.