
नवी दिल्ली : दिव्या देशमुख ही बुद्धिबळातील महेंद्रसिंह धोनी आहे, अशा शब्दांत दिव्याचे माजी प्रशिक्षक श्रीनाथ नारायणन यांनी तिच्या खेळाचे कौतुक केले आहे. दिव्या विश्वविजेती झाल्यानंतर त्यांनी दिव्याच्या खेळाबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, दबावाखाली संयमी अन् शांत राहून खेळ करण्यात ती तरबेज आहे. धोनीचा मैदानावरील शांत स्वभाव हा दिव्या जेव्हा पटावर बुद्धिबळ खेळत असते, तेव्हा प्रकर्षाने दिसून येतो.