Champions League : ड्रॉटमंडची अंतिम फेरीत धडक ; एम्बापेचे पीएसजीशी नाते संपुष्टात

बोरुयिसा ड्रॉटमंड संघाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पीएसजीचा १-० असा पराभव करून चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवासह फुटबॉल सुपरस्टार कायले एम्पाबेचे पीएसजीसह असलेले नाते संपुष्टात आले.
Champions League
Champions Leaguesakal

पॅरिस : बोरुयिसा ड्रॉटमंड संघाने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पीएसजीचा १-० असा पराभव करून चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या पराभवासह फुटबॉल सुपरस्टार कायले एम्पाबेचे पीएसजीसह असलेले नाते संपुष्टात आले. ड्रॉटमंडने २०१३ नंतर यंदा प्रथमच चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्यात त्यांनी १-० विजय मिळवला होता. आज झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सामन्यात मॅटस हुमेल्सने ५०व्या मिनिटाला गोल केला तोच सामन्यातला निर्णायक गोल ठरला. अशाप्रकारे त्यांनी पीएसजीवर सरासरी २-० अशी मात केली.

हा गोल होण्याअगोदर पीएसजीच्या वॉरेन झाईर इमरी याने गोल करण्याची सुवर्णसंधी वाया घालवली. चेंडू गोल जाळ्यापर्यंत तो घेऊन गेला; परंतु गोल जाळ्यात त्याला मारता आला नाही. सामन्याच्या सुरुवातीलाही त्यांनी अशाच संधी घालवल्या होत्या. २०११मध्ये कतार स्पोर्ट्सने पीएसजी संघाची मालकी घेतल्यानंतर त्यांनी दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात आणले होते त्यात सुपरस्टार लिओनेल मेस्सी, ब्राझीलचा नेमार आणि कायलिएन एम्बापे यांचाही समावेश होता.

या दरम्यान त्यांनी काही विजेतेपदे मिळवली; परंतु चॅम्पियन्स लीग जिंकण्याचे ध्येय पूर्ण करता आले नाही. २०२० मध्ये उपविजेतेपद हीच त्यांची मोठी कामगिरी ठरली. उपांत्य फेरीचा दुसरा सामना बायरन म्युनिक आणि रेयाल माद्रिद यांच्यात होणार आहे. पहिल्या टप्यात २-२ अशी बरोबरी झालेली आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना १ जून रोजी नियोजित आहे.

या उपांत्य फेरीच्या सामन्यात पीएसजी संघाला विजय मिळवून देण्यासाठी एम्बापेने प्रयत्न केले; परंतु तो पूर्ण सामन्यात अपेक्षित प्रभाव पाडू शकला नाही. त्याचा एक प्रयत्न ड्रॉटमंडचा गोलरक्षक ग्रगॉर कोबेल याने हाणून पाडला. त्याचा आणखी एक प्रयत्न फॅबिन रुईत्झने रोखला. उत्तरार्धात पीएसजीकडून चार वेळा तरी ड्रॉटमंडच्या क्षेत्रात मुसंडी मारण्यात आली. यावेळीही एम्बापेने मारलेला एक फटका अडवण्यात आला. तर मार्किन्हिओसचा हेडर थोडक्यात बाहेर केला.

एम्बापेचा पीएसजीकडून अखेरचा सामना

आता एम्बापेही करार पूर्ण झाल्यामुळे पीएसजीला गुडबाय करून रेयाल माद्रिदकडे येत्या हंगामापासून जाणार आहे. ड्रॉटमंडविरुद्धचा हा सामना त्याचा पीएसजीकडून अखेरचा सामना ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com