Divya Deshmukh Grandmaster title after World Championship win : १९ वर्षीय दिव्या देशमुखने सोमवारी महिला जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावताना भारताच्याच अनुभवी कोनेरू हंपीला पराभूत केले. अंतिम फेरीच्या दोन्ही लढती बरोबरीत सुटल्यानंतर हा सामना टाय ब्रेकरमध्ये खेळवला गेला. पहिल्या टाय ब्रेकरमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळूनही दिव्याला विजय मिळवता आला नाही आणि हंपीने सामना बरोबरीत रोखला. दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये हंपीकडे पांढऱ्या मोहऱ्यांचा अडव्हाटेंज होता, परंतु दिव्याने जबरदस्त कामगिरी केली.