"५० वर्षांच्या कारकिर्दीत ट्रीपल महाराष्ट्र केसरीसाठी खेळणारा मी पहिला मल्ल होतो. पुण्यात स्पर्धा होणार होती, मात्र तिथं राजकारण शिजलं."
सांगली : ‘‘पुणे जिल्ह्यातील सांगवी मुक्कामी २००९ ला झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत (Maharashtra Kesari Wrestling Competition) ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी आखाड्यात उतरलो होतो. ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एखादा मल्ल तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्यासाठी लढत होता, मात्र पुण्यात राजकारण शिजलं. पुणेकरांनी ठरवून सहा मिनिटांची कुस्ती दीड तास लांबवली. माझा मानसिक छळ होईल, अशीच ती रचना होती. त्यांनी ठरवून मला त्या सन्मानापासून रोखलं,’’ असा आरोप डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.