"२००९ ला माझ्यावर झालेल्या आघातातून मी अद्याप बाहेर पडलो नाही. मी तणावात होतो. अगदी त्यावेळी आत्महत्येचा विचार माझ्या मनात आला होता. मित्रांच्या मदतीतून मी बाहेर पडलो."
सांगली : ‘‘महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सन २००९ मध्ये माझ्यावर अन्याय झाल्याची कबुली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी द्यावी. ती नाही दिली तर मी दोन दिवसांत माझ्या महाराष्ट्र केसरी गदा परत करेन,’’ असा इशारा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Double Maharashtra Kesari Chandrahar Patil) यांनी दिला.