
बंगळूर : दोन वेळचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स याने नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धेमधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अँडरसन पीटर्स याने मंगळवारी याबाबतचा निर्णय घेतला. पोलंडचा सीप्रीयन झीग्लॉड याचा समावेश आता नीरज चोप्रा क्लासिक भालाफेक स्पर्धेमध्ये करण्यात आला आहे. ही स्पर्धा येत्या ५ जुलैला बंगळूरमध्ये पार पडणार आहे.