क्रिकेटच्या मैदानात दगडफेक; खेळाडूनेच केलं अशोभनिय कृत्य

sabbir rahman
sabbir rahman File Photo

ढाका प्रीमियर लीग (DPL) च्या 2021 हंगामात क्रिकेटच्या मैदानात सातत्यपूर्ण लाजीरवाण्या घटना घटताना दिसत आहेत. सामन्यातील खेळाडूच्या कामगिरीपेक्षा खेळाडूंच्या अखिलाडूवृत्तीच्या दर्शनामुळे स्पर्धे चर्चेत आली आहे. बांगलादेशचा स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन याने अंपायरशी घेतलेला पंगा आणि त्यानंतर त्याच्यावर झालेली कारवाई हे प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे बांगलादेशच्या आणखी एका खेळाडूने मैदानात लाजीरवाणे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (DPL 2021: Complaint filed against Sabbir Rahman for alleged racial abuse and stone throwing)

ढाका प्रीमियर लीगमध्ये DOHS स्पोर्ट्स क्लब आणि शेख जमाल धनमंडी क्रिकेट क्लब यांच्यात सामना रंगला होता. हा सामना ज्या मैदानात सुरु होता त्याच्या बाजूच्या बीकेएसपी-4 मैदानात टीम लेजेंड्स ऑफ रूपगंज आणि पारटेक्स स्पोर्टिंग क्लब यांच्यात लढत नियोजित होती. रुपगंज संघाचा शब्बीर रहमान याने सीमारेशेच्या बाहेरून इलियास सनी या जमाल धनमंडी क्रिकेट क्लबच्या खेळाडूवर विटांचे तुकडे फेकल्याचा प्रकार घडला. शब्बीरने वर्णद्वेषाची टिप्पणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

sabbir rahman
WTC INDvsNZ : फायनलसाठी टीम ठरली! सिराज बाकावरच!

सामन्यानंतर शेख जमाल टीमने ढाका मेट्रोपोलिस (सीसीडीएम) क्रिकेट समितीकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली. रहमान याच्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलीये. इलियास सनीने ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही फिल्डिंग करत असताना रूपगंजच्या खेळाडूंची बस बीकेएसपी-3 मैदानाजवळ आळी. यावेळी शब्बीरने आक्षेपार्ह शब्द वापरले. त्याने विटा देखील फेकून मारल्या. या प्रकारानंतर फिल्ड अंपायरकडे तक्रार केल्याचेही इलियास सनीने सांगितले.

सामन्यानंतर टीमने देखील शब्बीर विरोधात तक्रार केली आहे. व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना शब्बीरकडून अपमानास्पद शब्द वापरणे आणि वर्णभेदाचा टिप्पणी करणे अशोभनिय आहे. या कृत्याबद्दल त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

sabbir rahman
WTC Final : किवींना पंत-शुभमनचेही टेन्शन!

मैदानात अखिलाडूवृत्तीचा प्रकार शब्बीरकडून पहिल्यांदाच घडलेला नाही. जानेवारी 2018 मध्ये त्याने साईट स्क्रीनच्या मागे जाऊन एका लहान मुलाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. शब्बीर रहमान बांगलादेशकडून 11 टेस्ट, 66 वनडे आणि 44 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. दुसरीकडे इलियास सनीने आतापर्यंत 4 कसोटी, 4 वनडे आणि 7 टी20 सामने खेळले आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com