Shocking : भारतीय क्रीडाविश्वात शोककळा... आशियाई सुवर्णपदक विजेत्या जसपाल राणा यांचे निधन, घडवलेत मनू भाकरसह अनेक खेळाडू

Jaspal Rana dies at 49 Indian shooting coach: भारतीय क्रीडाविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज नेमबाज, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आणि ख्यातनाम प्रशिक्षक जस्पाल राणा यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले.
Jaspal Rana dies at 49 Indian shooting coach

Jaspal Rana dies at 49 Indian shooting coach

esakal

Updated on

Former Asian Games gold medallist Jaspal Rana passes away: भारताचे प्रसिद्ध नेमबाज आणि ऑलिम्पिक पदक विजेते प्रशिक्षक जसपाल राणा यांचे ४९ व्या वर्षी निधन झाले आहे. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेने (NRAI) त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. जसपाल राणा हे भारताचे अत्यंत यशस्वी नेमबाज होते. त्यांनी १९९४ च्या हिरोशिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games) सुवर्णपदक जिंकले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तब्बल १५ पदके (९ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य) जिंकली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com