DRS Technical Glitch : DRS थकलं! यजमानांना आधी बेल्सने नंतर DRS ने दिला दगा, गिल थोडक्यात वाचला

Bangladesh Vs India 1st DRS Technical Glitch
Bangladesh Vs India 1st DRS Technical Glitch esakal

Bangladesh Vs India 1st DRS Technical Glitch : भारताचा सलामीवीर शुभमन गिलने दुसऱ्या डावात आपले पहिले वहिले कसोटी शतक ठोकले. त्याने आक्रमक फलंदाजी करत 152 चेंडूत 110 धावांची शतकी खेळी केली. मात्र या शतकी खेळीला नशीबाची देखील मोठी साथ लाभली आहे. ऐनवेळी डीआरएस बंद पडल्यामुळे शुभमन गिलला झुकतं माप मिळालं अन् त्यानं त्याचा चांगला फायदा उचलत शतकी खेळी केली.

Bangladesh Vs India 1st DRS Technical Glitch
BAN vs IND : गिलचे पहिले तर पुजाराचे वेगवान कसोटी शतक; तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील 32 व्या षटकात डीआरएसने बांगलादेशचा घात केला. यासीर अलीने 32 व्या षटकाचा पहिला चेंडू टाकला. हा चेंडू भारताचा सलामीवीर शुभमन गिलच्या पॅडवर येऊन आदळला. बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली. मैदानावरील पंचांनी ही अपील फेटाळून लावत गिलला नाबाद ठरवले. मात्र बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने कधी नव्हे ते डीआरएस घेतला. यानंतर मैदानावर बराच काळ गोंधळाचे वातावरण होते. अखेर पंचांनी शाकिबला डीआरएस घेता येणार नाही असे सांगितले. कारण डीआरएसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. शाकिब यामुळे खूप चिडला होता.

Bangladesh Vs India 1st DRS Technical Glitch
Cheteshwar Pujara : म्हातारा समजू नका! गिल पेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखत ठोकलंय शतक

विशेष म्हणजे मैदानावरील पंचांनी गिलला नाबाद ठरवल्यामुळे त्याचा फायदा गिलला झाला. मात्र जर उलटं झालं असतं तर गिलला याचा मोठा फटका बसला असता. बागंलादेशला या सामन्यात दुसऱ्यांदा नशीबाने दगा दिला. भारताच्या पहिल्या डावात इबादत हुसैनने श्रेयस अय्यरचा त्रिफळा उडवला होता. बेल्सची लाईटही लागली मात्र बेल्स काही खाली पडली नाही. त्यामुळे अय्यर नाबाद राहिला. त्याने पहिल्या डावात 86 धावा केल्या मात्र त्याला शतकी खेळी करता आली नाही इबादातनेच त्याचा दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात त्रिफळा उडवला.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com