BAN vs IND : गिलचे पहिले तर पुजाराचे वेगवान कसोटी शतक; तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh Vs India 1st Test Day 3

BAN vs IND : गिलचे पहिले तर पुजाराचे वेगवान कसोटी शतक; तिसऱ्या दिवशी भारताची सामन्यावर पकड

Bangladesh Vs India 1st Test Day 3 : भारत बांगालदेश पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने आपला दुसरा डाव 258 धावांवर घोषित करत बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे आव्हान ठेवले. भारताने तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात संपुष्टात आणला होता. भारताकडून कुलदीप यादवने 40 धावात 5 तर मोहम्मद सिराजने 4 विकेट घेतल्या. त्यानंतर पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारताने शुभमन गिल (110) आणि चेतेश्वर पुजारा (102) शतकी खेळीच्या जोरावर दुसऱ्या डावात 2 बाद 258 धावा केल्या. यानंतर बांगलादेशने तिसऱ्या दिवसअखेर 12 षटकात नाबाद 42 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी शंतो 25 तर झाकीर हसन 17 धावा करून नाबाद होते.

हेही वाचा: DRS Technical Glitch : DRS थकलं! यजमानांना आधी बेल्सने नंतर DRS ने दिला दगा, गिल थोडक्यात वाचला

भारताने बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात गुंडाळल्यानंतर फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामी जोडी केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी 70 धावांची दमदार भागीदारी रचली. यात शुभमन गिलच्या आक्रमक खेळाची वाटा मोठा होता.

केएल राहुल 23 धावा करून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. गिलने संधी मिळताच मोठे फटके मारत टी टाईमपर्यंत 80 धावांपर्यंत मजल मारली. टी टाईमनंतर गिलने आपले शतक पूर्ण करण्यासाठी फार वेळ लावला नाही. त्याने चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले.

हेही वाचा: Cheteshwar Pujara : म्हातारा समजू नका! गिल पेक्षा जास्त स्ट्राईक रेट राखत ठोकलंय शतक

गिलने पुजारासोबत दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचली. गिल 152 चेंडूत 110 धावा करून माघारी परतला. यानंतर पुजारने आपला गिअर बदलला आणि चौकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुजाराने अर्धशतकानंतर आक्रमक फलंदाजी करत 130 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पुजाराचे हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक ठरले. यानंतर भारताने आपला दुसरा डाव 2 बाद 258 धावांवर घोषित केला. भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 513 धावांचे टार्गेट ठेवले.

हेही वाचा : काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये