
सोमवारी (२ जून) क्रीडा क्षेत्रातील तीन दिग्गजांनी निवृत्तीच्या घोषणा केल्या आहेत. आधी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने वनडेतून निवृत्ती घेतली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर आता भारताचा दिग्गज कबड्डीपटू परदीप नरवालनेही निवृत्तीची घोषणा केली आहे.