Asian Shooting Championship: भारताच्या इलावेनिलची सुवर्णपदकावर मोहर; आशियाई नेमबाजी स्पर्धेत यश
Elavenil Valarivan: भारतीय नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. ज्युनियर गटातही भारतीय महिला नेमबाजांनी संघात्मक प्रकारात सुवर्ण मिळवत जागतिक आणि आशियाई विक्रम केला.
नवी दिल्ली : भारताची महिला नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधला. इलावेनिल हिने आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावताना देदीप्यमान कामगिरी नोंदवली.