what happened during Dharamshala IPL match : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर 8 मे रोजी धर्मशाळा येथे सुरू असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली सामना मध्येच थांबवण्यात आला होता. तसेच सर्व प्रेक्षकांना मैदान सोडण्यास सांगण्यात आले होते. सुरुवातीला तांत्रिक कारणामुळे सामना थांबवल्याचे अनेकांना वाटले, पण नंतर पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले.