
हैदराबाद : एलिट महिला बॉक्सिंग स्पर्धा उद्यापासून (ता. २७) हैदराबाद येथे सरुरनगर येथे खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक पटकावणारी लवलीना बोर्गोहेन आणि दोन वेळची जगज्जेती निखत झरीन या स्टार खेळाडूंचा सहभाग असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत आणखीनच वाढली आहे.