Eng vs Ind 2nd ODI: लॉर्डसवर मालिका विजयाची संधी, विराटला विश्रांतीच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eng vs Ind 2nd ODI match today win

Eng vs Ind 2nd ODI: लॉर्डसवर मालिका विजयाची संधी, विराटला विश्रांतीच!

India vs England 2nd ODI : ट्वेन्टी-२० मालिकेत सलग दोन सामने जिंकून मालिका जिंकणाऱ्या भारताला आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही मोहीम फत्ते करण्याची संधी ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर आहे. दुखापत झालेला विराट कोहली या सामन्यातही मुकण्याची शक्यता आहे.

५०-५० षटकांचा सामना ट्वेन्टी-२० प्रमाणे खेळावा अशा प्रकारे भारतीयांनी इंग्लंडचा पहिल्या सामन्यात धुव्वा उडवला, त्यामुळे यजमान आता उलटवार करण्याच्या तयारीत आहेत. भारतीयांनाही त्याची जाणीव आहे, त्यामुळे भारतीय संघही सज्ज आहे.

हेही वाचा: ब्रिटनच्या संसदेकडून BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुलींचा गौरव

गुरुवारच्या सामान्याकरता दोन्ही संघांत बदल होण्याची शक्यता नाही. एक तर गोलंदाजीला मदत करणारी खेळपट्टी भारतीय वेगवान गोलंदाजांना मिळाली तर काय करामत ते करून दाखवतात हे संयोजकांना बरोबर समजले आहे आणि गेले काही दिवस लंडन शहरात कडक उन्हाळा जाणवत असल्याने लॉर्ड्सची खेळपट्टी फलंदाजीला पोषक असणार हे निश्चित आहे.

विराटला विश्रांतीच

मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे विराट कोहलीला मंगळवारी झालेल्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. अशी दुखापत दोन दिवसांत पूर्णतः बरी होण्याची शक्यता कमी असते शिवाय या सामन्यात मधल्या फळीतील खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे विराटसाठी जागा रिकामी करण्याची शक्यता कमी आहे.

हेही वाचा: Arun Lal : नवविवाहित अरूण लाल यांचा राजीनामा; कारण वाढतं वय, थकवा!

लॉर्डस हाऊसफुल्ल

आठवड्याचा कामाचा वार असला आणि तिकिटांचे दर खूप महाग असले तरी लॉर्डसचे प्रेक्षागृह तुडुंब भरलेले असेल.

Web Title: Eng Vs Ind 2nd Odi Match Today Win The Series At Lords Virat Kohli Not Playing Today India Vs England

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..