Arun Lal : नवविवाहित अरूण लाल यांचा राजीनामा; कारण वाढतं वय, थकवा!

Newly Married Arun Lal Resign From Bengal Cricket Team Coach Post Due To Age And Tiredness
Newly Married Arun Lal Resign From Bengal Cricket Team Coach Post Due To Age And Tirednessesakal

नवी दिल्ली : बंगाल क्रिकेट असोसिएशनला आधी वृद्धीमान सहाने सोडले आता प्रशिक्षक अरूण लाल (Arun Lal) यांनी देखील सोडचिठ्ठी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्यापेक्षा 28 वर्षांनी लहान असलेल्या युवतीशी लग्नगाठ बांधल्यानंतर अरूण लाल चर्चेत आले होते. आता त्यांनी बंगाल क्रिकेट संघांच्या प्रशिक्षक (Bengal Cricket Team Coach) पदाचा राजीनामा (Resign) देताना जे कराण दिले आहे त्यामुळे जास्त चर्चेत आले आहेत.

Newly Married Arun Lal Resign From Bengal Cricket Team Coach Post Due To Age And Tiredness
Cristiano Ronaldo : PSG ने रोनाल्डोला करारबद्ध करण्याची संधी दवडली?

अरूण लाल माध्यमांशी बोलताना म्हणाले की, 'माझा हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आहे. याला कोणत्याही वादाची पार्श्वभूमी नाही. मी बंगाल क्रिकेट असोसिएशनला (CAB) संघाचे प्रशिक्षक पद सोडत असल्याचे सांगितले. हे आठवड्याचे 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास काम आहे. आम्हाला पूर्ण दिवस प्रवास करावा लागतो. क्रिकेटच्या संघाला प्रशिक्षण देणे अवघड काम असते. मला वाटते की मी म्हातारा होत आहे. यामुळे मी माघार घेत आहे.'

Newly Married Arun Lal Resign From Bengal Cricket Team Coach Post Due To Age And Tiredness
Singapore Open 2022 : सायना नेहवाल जिंकली; कश्यप पहिल्याच फेरीत गारद

अरूण लाल यांनी 11 जुलैला बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव स्नेहाशीष गांगुली यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता. अरूण लाल पुढे म्हणाले की, 'मी हा निर्णय आनंदाने घेत आहे. कोणतीही नाराजी नाही. मी फक्त वयस्कर होत आहे. बंगालच्या संघाने आता चांगली प्रगती केली आहे. मुलं चांगली कामगिरी करत आहेत. मला आशा आहे की त्यांचे भविष्य उज्वल आहे. पुढची 3 ते 5 वर्षे बंगालची मुलं चांगली कामगिरी करतील.'

बंगालचा संघ यंदाच्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत टॉप 4 संघात समाविष्ट होती. 2019 - 20 च्या सत्रात देखील त्यांचा संघ फायनलमध्ये पोहचला होता. मात्र त्यांना रणजी ट्रॉफी टायटल जिंकता आले नव्हते. अरूण लाल यांनी वाटते की बंगालचा संघ येत्या काही वर्षात अव्वल स्थानावर असेल.

Newly Married Arun Lal Resign From Bengal Cricket Team Coach Post Due To Age And Tiredness
आफ्रिदीचं सर्वाधिक षटकारांच वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडणार, रोहित की...

अरूण लाल यांनी 28 वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत केले लग्न

अरूण लाल यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेशाने शिक्षिका असलेल्या बुलबुल साहा यांच्याशी दुसरे लग्न केले. बुलबुल साहा 38 वर्षाच्या आहेत तर अरूण लाल 66 वर्षाचे आहेत. अरूण लाल यांनी भारताकडून 16 कसोटी सामने खेळले असून त्यांनी 6 अर्धशतकांच्या जोरावर 729 धावा केल्या आहेत. तर 13 वनडे सामन्यात एक अर्धशतक ठोकत 122 धावा केल्या. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 156 सामन्यात 10,421 धावा केल्या आहेत. त्यात 30 शतके आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी कॅन्सवर देखील मात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com