सूर्या-पृथ्वी कसोटीसाठी इंग्लंडला टेकऑफ करणार

बीसीसीआयने याची तयारी सुरु केलीये
Suryakumar Yadav and Prithvi Shaw
Suryakumar Yadav and Prithvi Shaw E Sakal

England vs India Test Series : धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या ताफ्यातील स्टार खेळाडू इंग्लंडला पाठवण्याची तयारी सुरु आहे. सुर्यकुमार यादव आणि सलामीवर पृथ्वी शॉ ही दोघे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 दौरा सोडून विराट सेनेच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी शुभमन गिल, वाशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यांनी इंग्लंड दौऱ्यावरुन माघार घेतल्यानंतर टीम व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे त्यांच्या जागेवर अन्य खेळाडूंना इंग्लंडला पाठवण्याची विनंती केलीये. सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ आणि जयंत यादव या तिघांना इंग्लंडला पाठवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दोन ते तीन दिवसात याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (Suryakumar Yadav Prithvi Shaw will be flying to England as replacements for ruled out players due to injury)

Suryakumar Yadav and Prithvi Shaw
'चंदेरी' कामगिरीनंतर मीराबाई चानू झाली भावूक; देशवासियांचे मानले आभार

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये बदली खेळाडू पाठवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे म्हटले आहे. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव आणि जयंत यादव यांना इंग्लंडला पाठवण्याच विचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिलीये. सध्याच्या घडीला पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव हे श्रीलंका दौऱ्यावर आहेत. ते मालिका संपवून इंग्लंडला जाणार की मध्येच त्यांना इग्लंडला पाठवण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Suryakumar Yadav and Prithvi Shaw
Olympics : जे 25 वर्षांत घडलं नाही ते नागलनं करुन दाखवलं

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी अजिंक्य रहाणेही दुखापतीने त्रस्त आहे. तो यातून सावरुन पुन्हा कमबॅक करेल, असा विश्वास टीम व्यवस्थापनाने यापूर्वीच व्यक्त केलाय. जर तो रिकव्हर झाला नाही तर त्याच्या अनुपस्थितीत केएल राहुलही प्लेइंग इलेव्हनसाठी उपलब्ध आहे. पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादवशिवाय जयंत यादवला सँडबाय खेळाडू म्हणून बोलवण्यात येणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला जॉईन होणाऱ्या खेळाडूंना हार्ड क्वॉरंटाईनचे पालन करावे लागणार की त्यांना यातून काही सूट मिळणार हे देखील पाहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com