esakal | 'चंदेरी' कामगिरीनंतर मीराबाई चानू झाली भावूक; देशवासियांचे मानले आभार
sakal

बोलून बातमी शोधा

'चंदेरी' कामगिरीनंतर मीराबाई चानू झाली भावूक; देशवासियांचे मानले आभार

'चंदेरी' कामगिरीनंतर मीराबाई चानू झाली भावूक; देशवासियांचे मानले आभार

sakal_logo
By
सूरज यादव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पदकाचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्य पदक पटकावलं आहे. 49 किलो वजनी गटात तिने ही कामगिरी केली आहे. चानूने क्लिन आणि जर्कमध्ये 115 किलो वजन उचललं तर स्नॅचमध्ये 87 किलो वजन उचललं. तिने एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पटकावल्यानंतर खरंच स्वप्न पूर्ण झाल्याचं तिने म्हटलं आहे. रौप्य पदक देशाला अर्पण करत आहे. तसंच या प्रवासात पाठिंबा दिलेल्या सर्व भारतीयांचे आभार चानूने मानले आहेत.

मीराबाई चानूने ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर भारतीय पाठिराख्यांचे आणि घरच्यांचे आभार मानले आहेत. आईने खूप मोठा त्याग केला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. देशासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याचा खूप आनंद झाला असल्याचं चानूने म्हटलं आहे.

हेही वाचा: कोरोना निर्बंध; पाहा मीराबाई पदक स्वीकारताना काय घडलं (VIDEO)

भारताकडून ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती फक्त दुसरी वेटलिफ्टर ठरली आहे. याआधी कर्णम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. मीराबाई चानूला मागे टाकत चीनच्या होऊ झिऊईने एकूण 2010 किलो वजन उचलत सुवर्ण पदक पटकावलं. तर इंडोनेशनियाची एसाह विंडी कांटिका ही 194 किलोसह तिसऱ्या स्थानी राहिली.

हेही वाचा: Olympics : जे 25 वर्षांत घडलं नाही ते नागलनं करुन दाखवलं

रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये चानूची निराशा झाली होती. मात्र त्यानंतर चानूने कामगिरी सुधारत 2017 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलं होतं.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारत

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चानूने रौप्य पटकावून भारताचं पदकाचं खातं उघडलं. पण दुसऱ्या बाजूला दहा मीटर एअर पिस्टलमध्ये शूटर सौरभ चौधरी पदकापासून दूर राहिला. त्याला अंतिम फेरीत आठ पैकी सातव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या हॉकी संघाने न्यूझीलंडला पराभूत करून ऑलिम्पिकमध्ये विजयी सुरुवात केली आहे.

loading image
go to top