इंग्लंड दौऱ्यासाठी विकेटमागे तगडा 'बॅकअप' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KS Bharat and dravid

इंग्लंड दौऱ्यासाठी विकेटमागे तगडा 'बॅकअप'

मुंबई : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात आणखी एका युवा खेळाडूला संधी देण्यात आलीये. आंध्र प्रदेशचा विकेटकिपर बॅट्समन केएस भरत (KS Bharat) हा देखील भारतीय संघासोबत इंग्लंडला जाणार आहे. वृद्धिमान साहाच्या बॅकअपसाठी त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. वृद्धिमान साहाला आयपीएल दरम्यान कोरोनाची लागण झाली होती. यातून सावरुन तो घरी परतला असून टीम इंडियात तो सामील होणार असल्याचे वृत्त आले होते. आयत्यावेळी कोणतेही संकट येऊ नये, याचा विचार करुन टीम इंडियाने युवा खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. (eng vs ind test wicket keeper batsman ks bharat joined team india for england tour)

इंग्लंड दौऱ्यावर स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेल्यामुळे ही संख्या आता 5 वर पोहचली आहे. यापूर्वी अभिमन्यू ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अरजान नागवसवाला यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती.

हेही वाचा: राणादाच्या बायकोची कमाल; सोशल मीडियावर व्हिडिओ करतोय धमाल

केएस भरत यापूर्वी देखील अनेक वेळा स्टँडबाय खेळाडू म्हणून टीम इंडियात सहभागी राहिल्याचे पाहायला मिळाले होते. 27 वर्षीय केएस भरत देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशचे प्रतिनिधीत्व करतो. त्याने आतापर्यंत 78 प्रथम श्रेणीत 37.24 च्या सरासरीने 4283 धावा केल्या आहेत. यात 9 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. प्रथम श्रेणीत 308 ही त्याची सर्वोच्च कामगिरी आहे. भरतने 51 लिस्ट ए मॅचेसमध्ये 28.14 च्या सरासरीने 1351 धावा केल्या आहेत. लिस्ट एमध्ये त्याच्या नावे 3 शतकांची नोंद असून 5 अर्धशतकांचाही समावेश आहे. भरत ने 48 टी-20 सामन्यात 730 धावा केल्या आहेत.

हेही वाचा: WTC : चॅम्पियन्स रुबाबसाठी हिटमॅनचा तोरा ठरेल महत्त्वाचा

भारतीय संघ 2 जून रोजी मुंबईहून इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्धची चॅम्पियनशिप फायनलची लढत आणि इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. 18 ते 22 जून चॅम्पियनशिपची फायनल रंगणार असून त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

loading image
go to top