ही जोडी तुटायची नाय! विराटकडून शास्त्रींना 'स्पेशल' गिफ्ट : Virat Kohli Offered Champagne Ravi Shastri | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eng vs ind Virat Kohli rishabh pant offered champagne bottle Ravi Shastri

ही जोडी तुटायची नाय! विराटकडून शास्त्रींना 'स्पेशल' गिफ्ट

Eng vs Ind Virat Kohli Offered Champagne Ravi Shastri: इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर आधी टी-20 नंतर एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने पराभूत केले. रविवारी खेळल्या गेलेल्या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 5 गडी राखून विजय मिळवला. यावेळी भारतीय संघ पूर्णपणे सेलिब्रेशनमध्ये होता. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला ऋषभ पंत ज्याने नाबाद शतक केले.

विजयानंतर सेलिब्रेशनमध्ये मग्न झालेल्या भारतीय खेळाडूंनी कर्णधार रोहित शर्माला शॅम्पेनने अंघोळ घातली. टीम इंडियाने हा मालिका विजय अनोख्या पद्धतीने साजरा केला, दरम्यान, एक वेगळीच घटना घडली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.(eng vs ind Virat Kohli rishabh pant offered champagne bottle Ravi Shastri)

हेही वाचा: Video : मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहितला शॅम्पेनने घातली अंघोळ

ऋषभ पंत आणि रवी शास्त्री यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टीम जिंकल्यानंतर सेलिब्रेशनच्या मधून ऋषभ पंतने शॅम्पेनची बाटली घेऊन मैदानात उभ्या असलेल्या माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडे गेला. जवळ जाऊन पंतने रवी शास्त्रींना मिठी मारली आणि शॅम्पेनची बाटली दिली. रवी शास्त्रींना शॅम्पेनची बाटली आधी विराट कोहलीने ऑफर केली होती. त्यानंतर ऋषभ पंत रवी शास्त्रीकडे गेला आणि विराटचे स्पेशल गिफ्ट त्यांना दिल. या बाबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची खूप चर्चा होत आहे.

Web Title: Eng Vs Ind Virat Kohli Rishabh Pant Offered Champagne Bottle Ravi Shastri As India Seal Odi Series Video

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top