ENG vs NZ: क्रिकेटच्या पंढरीत अँडरसनच्या नावे मोठा विक्रम

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या सर एलेस्टर कूक याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केलीये.
anderson
andersonnews agency
Summary

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या सर एलेस्टर कूक याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केलीये.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सच्या मैदानात सुरु असलेला कसोटी सामना जेम्स अँडरसनसाठी खास असा आहे. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जीमीच्या नावे खास विक्रमाची नोंद झालीये. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या सर एलेस्टर कूक याच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केलीये.

अँडरसन न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडकडून 161 वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलाय. इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम कूकच्या नावे होता. त्याने 161 कसोटी सामने खेळले आहेत. या विक्रमाशी जेम्स अँडरसनने बरोबरी केलीये. या यादीत स्टुअर्ट ब्रॉड तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने इंग्लंडकडून 147 कसोटी सामने खेळले आहेत. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर एलेक स्टीवर्ट आणि इयान बेल यांचा नबर लागतो. या दोघांनी अनुक्रमे 133 आणि 118 कसोटी सामने खेळले आहेत.

anderson
पाक क्रिकेटर म्हणाला, रणनिती आखण्यात धोनी 'बापमाणूस'

इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे 5 खेळाडू

जेम्स अँडरसन - 161*

एलेस्टेयर कुक - 161

स्टुअर्ट ब्रॉड - 147*

एलेक स्टीवर्ट - 133

इयान बेल - 118

anderson
न्यूझीलंड विरुद्ध खेळताना जो रुटचे टिम इंडियाला चॅलेंज

अँडरसनने 160 सामन्यात 614 विकेट घेतल्या आहेत. 7/42 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. क्रिकेट जगतातील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जलदगती गोलंदांमध्ये तो अव्वलस्थानी आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 200 कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉ आणि रिकी पाँटिंग यांनी प्रत्येकी 168-168 कसोटी सामने खेळले आहेत. मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही सचिनच्याच नावे आहे. जर अँडरसन न्यूझीलंड विरुद्धच्या दोन आणि भारता विरुद्धच्या पाच कसोटी सामन्यात सलग खेळला तर सचिनचा हा विक्रम तो मागे टाकू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com