IND VS ENG: इंग्लंडचा संघ जाहीर, कोरोनाबाधित खेळाडूलाही मिळाली जागा

इंग्लंडने भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ केला जाहीर
england add sam billings squad for the rescheduled 5th test match against india  sports cricket
england add sam billings squad for the rescheduled 5th test match against india sports cricket

इंग्लंडने भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामना गेल्या वर्षी कोविड-19 मुळे होऊ शकला नाही. भारतीय संघ मालिकेत २-१ ने पुढे आहे. आता शुक्रवारपासून मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंड संघाने यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्सचा संघात समावेश केला आहे. आयपीएलमध्ये बिलिंग्स कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत होता. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची तिसरी कसोटी न खेळलेल्या जेम्स अँडरसनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.(england add sam billings squad for the rescheduled 5th test match against india)

बेन फॉक्स अलीकडेच कोविड 19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. सॅम बिलिंग्सच्या जागी एकमेव कसोटी सामन्यात फोक्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे. या सामन्यासाठी फॉक्सला संघात ठेवण्यात आले आहे. जर बेन फॉक्स फिट नाही झाला तर, बिलिंग्स पुन्हा कीपरची करताना दिसले. इंग्लंडचा स्टार कसोटी गोलंदाज जेम्स अँडरसन भारताविरुद्ध विक्रम करू शकतो. अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 650 विकेट घेण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये फक्त दोनच गोलंदाजांनी 650 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरन 800 विकेट्स आणि दिवंगत शेन वॉर्न 708 विकेट हे दोघेही फिरकीपटू आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा अँडरसन हा पहिला वेगवान गोलंदाज ठरणार आहे.

रोहित शर्मा लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तो खेळतो का नाही यावर अजूनही शंका आहे. दरम्यान सलामीवीर मयंक अग्रवाल संघात सामील झाला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत मयंक सलामी करू शकतो. दुसरा सलामीवीर शुभमन गिल असेल, जो सराव सामन्यातही चांगला खेळला आहे. भारताकडे सलामीसाठी चेतेश्वर पुजाराचाही पर्याय आहे.

इंग्लंड संघ : बेन स्टोक्स, जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, सैम बिलिंग्स, स्टुअर्ट ब्रॉड, हैरी ब्रूक, जैक क्राउले, बेन फोक्स, जैक लीच, एलेक्स ली, क्रेग ओवरटन, जेमी ओवरटन, मैथ्यू पॉट्स, ओली पोप आणि जो रूट.

भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा आणि मयंक अग्रवाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com