India vs England Lords Test 2025 : गुरुवारपासून लॉर्ड्स मैदानावर भारत इंग्लड यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. मात्र, त्यापूर्वी इंग्लंड संघाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी वेगवान गोलंदाज गस एटकिन्सनला संघात सहभागी करून घेतलं आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे.