PAK vs ENG: इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडलं, इंग्लंडने पाकिस्तानची घरच्या मैदानावरच...

Pak vs Eng 3rd Test Match
Pak vs Eng 3rd Test Match

Pak vs Eng 3rd Test Match : पाकिस्तानच्या संघाला त्यांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कराची येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांची मालिका 3-0 ने क्लीन स्वीप केली. यासोबतच बाबर आझमचा कर्णधार असलेल्या पाकिस्तानी संघाच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही नोंदवला गेला आहे. पाकिस्तानने इतिहासात प्रथमच आपल्याच भूमीवर क्लीन स्वीप झाला आहे.

Pak vs Eng 3rd Test Match
Ranji Trophy: रणजी ट्रॉफीचा सामना 5 दिवसांऐवजी 4 दिवसांचा! हे आहे त्याच्या मागचं मोठं कारण

तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या 210 धावांवर आटोपला. याचा अर्थ इंग्लिश संघाला कराची कसोटी आणि मालिका क्लीन स्वीप करण्यासाठी 167 धावा करायच्या होत्या. 167 धावांचा पाठलाग करताना इंग्लिश संघाने पुन्हा एकदा धडाकेबाज सुरुवात केली आणि दोन्ही सलामीवीरांनी 11.3 षटकांत पहिल्या विकेटसाठी 87 धावा जोडल्या.

धडाकेबाज सुरुवातीनंतर, इंग्लिश संघासाठी विजय ही केवळ औपचारिकता होती आणि चौथ्या दिवशी सकाळी त्यांनी पहिल्या तासात उर्वरित 55 धावा करून सामना आणि मालिका खिशात घातली. बेन डकेटने 82 धावा केल्यानंतर शेवटपर्यंत नाबाद राहिला तर कर्णधार बेन स्टोक्सने 35 धावा केल्यानंतरही नाबाद राहिला. त्याचवेळी अबरार अहमदने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात दोन्ही विकेट घेतल्या.

Pak vs Eng 3rd Test Match
IND vs NZ ODI: न्यूझीलंड क्रिकेटला नवा चेहरा! विल्यमसन, साऊदीविना किवी संघ भारतात

इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिका

  • पहिली कसोटी (रावळपिंडी) – इंग्लंड ७४ धावांनी जिंकला

  • दुसरी कसोटी (मुलतान) – इंग्लंड २६ धावांनी जिंकला

  • तिसरी कसोटी (कराची) – इंग्लंड 8 विकेटने जिंकला

इंग्लंडने तब्बल 22 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. यापूर्वी 2000/01 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला होता तेव्हा त्यांनी मालिका 1-0 ने जिंकली होती. पाकिस्तानच्या भूमीवर इंग्लंडचा हा तिसरा कसोटी मालिका विजय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com