PAK vs ENG : लाहोरने निराश केलं असं इंग्लंडचा कर्णधार मोईन अली का म्हणाला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moeen Ali Statement About Lahore

PAK vs ENG : लाहोरने निराश केलं असं इंग्लंडचा कर्णधार मोईन अली का म्हणाला?

Moeen Ali Statement About Lahore : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच सात टी 20 सामन्यांची मालिका पार पडली. यातील काही सामने पेशावर आणि काही सामने लाहोर येथे खेळवण्यात आले. पाहुण्या इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्यातच मातीत 4 - 3 असे लोळवत मालिका खिशात टाकली. दरम्यान, मालिका झाल्यानंतर मोईन अली पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी त्याने पाकिस्तानने इंग्लंडला पुरवलेली सुरक्षा व्यवस्था, जेवण यावर आपले मत मांडले. यावेळी त्याने लाहोरमध्ये मजा आली नाही. त्यापेक्षा पेशावर चांगलं होतं असे वक्तव्य केले.

हेही वाचा: Prithvi Shaw : संघात स्थान न मिळाल्याने पृथ्वीने सोडले मौन, या गोष्टीमुळे...

मोईन अली म्हणाला की, मी लाहोरकडून थोडा निराश झालो. कराची खरंच खूप चांगलं होतं. मोईन अलीने हे वक्तव्य दोन्ही शहरातील जेवणावरून केलं होतं. सध्या मोईन अलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोईन अली पाकिस्तानने पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर देखील बोलला. तो पाकिस्तानच्या सुरक्षा व्यववस्थेवर खुष दिसला.

तो म्हणाला की, आम्हाला आमच्या अपेक्षेपेक्षा चांगली व्यवस्था मिळाली. आमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात आली. कराची आणि लाहोर पाकिस्तानची दोन मोठी शहरे आहेत. ही शहरे खेळातील प्रतिस्पर्धेसाठी ओळखली जातात. दोन्ही ठिकाणावरून अनेक दिग्गज क्रिकेटपटू क्रिकेट जगताला मिळाले आहेत.

हेही वाचा: Women's Asia Cup : मेघना - वर्माच्या शतकी सलामीमुळे भारताने मलेशियाविरूद्ध उभारल्या 181 धावा

मालिकेचा विजेता ठरवणाऱ्या सातव्या टी 20 सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 67 धावांनी पराभव करत मालिका 4 - 3 अशी खिशात टाकली. इंग्लंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 210 धावांचे आव्हान ठेवले होते. डेव्हिड मलानने सर्वाधिक नाबाद 78 धावा केल्या. पाकिस्तानला 210 धावांचा पाठलाग करताना 20 षटकात 8 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली.