Women's Asia Cup : मेघना - वर्माच्या शतकी सलामीमुळे भारताने मलेशियाविरूद्ध उभारल्या 181 धावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Asia Cup  India Women vs Malaysia Women Sabbhineni Meghana

Women's Asia Cup : मेघना - वर्माच्या शतकी सलामीमुळे भारताने मलेशियाविरूद्ध उभारल्या 181 धावा

India Women vs Malaysia Women : आशिया कप महिला क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना मलेशियाशी झाला. नाणफेक जिंकून मलेशियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारतीय सलामीवीर मेघना आणि शेफाली वर्मा यांनी फोल ठरवला. या दोघींनी 116 धावांची दमदार सलामी दिली. या सलामीच्या जोरावर भारताने 20 षटकात 4 बाद 181 धावांपर्यंत मजल मारली.

हेही वाचा: Mukesh Kumar : आर्मीचा युनिफॉर्म घालायचं स्वप्न तीन वेळा भंगलं पण आता टीम इंडियाच्या जर्सीत झळकणार

स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या साभिनेनी मेघनाने सुरूवातीपासूनच आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. दुसऱ्या बाजूने आक्रमक वृत्तीची शेफाली वर्माने तिला साध देण्याची भुमिका स्विकारली. मेघनाने 53 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 69 धावांची खेळी केली. तिने शेफाली वर्मासोबत 116 धावांची सलामी दिली. दुसऱ्या बाजूने शेफाली वर्माने देखील 39 चेंडूत 46 धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली.

हेही वाचा: VIDEO LLC : मिचेल जॉन्सनला पठाण भिडला; प्रकरण गेलं धक्काबुक्कीपर्यंत

मेघना 116 धावा झाल्या असताना बाद झाली. त्यानंतर शेफालीने भारताला 150 च्या पार पोहचवले. शेफाली 19 व्या षटकात बाद झाली. दरम्यान, रिचा घोषने 19 चेंडूत आक्रमक 33 धावांची खेळी करत भारताला 181 धावांपर्यंत पोहचवले. हेमलताने 4 चेंडूत 10 धावांची छोटेखानी खेळी करत हातभार लावला.