esakal | IND vs ENG: "त्यांना नावं ठेवण्याआधी तुम्ही काय केलं होतं ते आठवा"
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli-Joe-Root

IND vs ENG: "त्यांना नावं ठेवण्याआधी तुम्ही काय केलंत ते आठवा"

sakal_logo
By
विराज भागवत

इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा चाहत्यांना घरचा आहेर

Ind vs Eng 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीची सुरूवात आजपासून (१० सप्टेंबर) होणार होती. पण ही कसोटी कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) यांची दीर्घकाळ चर्चा झाली. त्यानंतर सामना सध्या तरी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या सामना पुनर्नियोजित करावा आणि दोन्ही संघाच्या सोयीनुसार खेळवावा अशी ऑफर BCCI ने ECB ला दिली आहे. पण इंग्लंडमधील काही क्रिकेट जाणकार आणि चाहते यांनी सामना रद्द झाल्यावर भारतीय संघाला नावं ठेवण्यास सुरूवात केली. त्यावरून भडकलेला केविन पीटरसन याने चाहत्यांना आरसा दाखवत घरचा आहेर दिला.

हेही वाचा: IND vs ENG: पाचवा कसोटी सामना रद्द! BCCI- ECB चर्चेनंतर निर्णय

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांच्यामुळे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांच्यासह तिघे आयसोलेशनमध्ये होते. तशातच ज्युनियर फिजीओ योगेश परमार यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतीय संघातील काही खेळाडूंनी सामना खेळण्यास नकार दिला. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. त्यावरून इंग्लंडमधील क्रिकेट फॅन्सनी भारतीय खेळाडू आणि BCCI वर टीका केली. पण, याच चाहत्यांना केविन पीटरसनने काही महिन्यांपूर्वीची आठवण करून दिली. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा नियोजित वन डे मालिकेचा दौरा इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या भीतीने रद्द केला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला मोठा भुर्दंड सोसावा लागला होता. त्यामुळे BCCI किंवा भारतीय खेळाडूंवर टीका करण्याआधी तुम्ही काय केलं होतं ते आठवा, अशा आशयाचे ट्वीट पीटरसनने केले.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

BCCI ची ECB ला नवी ऑफर

भारतीय चमूतील काहींना कोरोनाची बाधा झाल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. पण हा कसोटी सामना दोन्ही संघातील खेळाडूंच्या सोयीनुसार पुनर्नियोजित करावा अशी विनंती आम्ही ECB ला केली आहे. BCCI आणि ECB यांच्यातील व्यावहारिक संबंध सलोख्याचे आहेत. त्यामुळे ही विनंती करण्यात आली आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खेळण्याचा योग्य कालावधी कोणता असावा, याबद्दल दोन्ही क्रिकेट बोर्डांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होईल. खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षितता याला BCCI ने कायमच प्राधान्यक्रम दिला आहे. त्यामुळे सामन्याबाबत निर्णय घेण्यात आला, असे BCCIच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

loading image
go to top