esakal | इंग्लंडची चिटींग? रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

sakal_logo
By
सुशांत जाधव

India Vs England, 5th Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेती अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआय (BCCI) आणि इंग्लंड बोर्डाने कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 असा आघाडीवर होता. मात्र हा सामना रद्द झाल्याचा फायदा यजमान इंग्लंडला झाला आहे. यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे.

भारतीय खेळाडूंनी खेळायला नकार दिल्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ आली. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडच्या संघाला विजय घोषीत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बीसीसीआयला हा निर्णय मान्य नसल्याचेही समजते. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जर इंग्लंडला विजयी घोषीत करण्यात आले असले तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिल. याचा वर्ल्ड टेस्ट रँकिंगवरही परिणाम होईल.

हेही वाचा: VIDEO : भारतीय वंशाच्या फलंदाजाची कमाल; 6 चेंडूत 6 षटकार

चौथ्या कसोटी सामन्यावेळीच मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर पाचव्या सामन्याच्या आधी बुधवारी आणखी एका स्टाफ सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. टीम इंडियाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या ताफ्यात पुन्हा एकदा खळबळ माजली होती.

हेही वाचा: IND vs ENG: पाचवा कसोटी सामना रद्द! BCCI- ECB चर्चेनंतर निर्णय

यापूर्वी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. ते क्वारंटाईन असताना टीम इंडियाच्या ताफ्यात आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे टीम इंडिया सरावासाठी मैदानात उतरली नव्हती. त्यानंतर सर्व खेळाडूंची गुरुवारी RT-PCR टेस्ट करण्यात आली. खेळाडूंचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी या परिस्थितीत खेळण्याची टीम इंडियाची मानसिकता नव्हती. खेळाडूंनी बीसीसीआयला यासंदर्भात विनंती केली होती. त्यानंतर बीसीसीआय आणि ईसीबीने सामना रद्द केल्याची घोषणा केली.

loading image
go to top