ऍशेस मालिका: मैदानातच स्टिव्ह स्मिथ रडतोय, हे पाहा...

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. एजबेस्टन येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पेन याच्या निर्णयाचा फार फायदा ऑस्ट्रेलियाला झाला नाही.

लंडन : ऍशेस मालिकेच्या पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मैदानावरील वैर पाहायला मिळाले. इंग्लंडच्या प्रेक्षकांनी कहर करत स्टिव्ह स्मिथ रडतानाचे मुखवटे लावून अनेक प्रेक्षक मैदानात उपस्थित होते. त्यामुळे सँड पेपरचे ते प्रकरण अजूनही स्मिथ, वॉर्नर आणि ब्रँक्रॉफ्ट यांची पाठ सोडत नाही.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. एजबेस्टन येथे सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पेन याच्या निर्णयाचा फार फायदा ऑस्ट्रेलियाला झाला नाही. ऑस्ट्रेलियाने आघाडीच्या 3 फलंदाजांना स्वस्तात गमावले. एका बाजूला इंग्लंडच्या गोलंदाजांनी मैदानात ऑस्ट्रेलियावर दबाव टाकला होता. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडच्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याची कोणताही संधी सोडली नाही.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्ट्रीव्ह स्मिथचा रडतानाचा चेहरा पहायला मिळाला. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरन बँक्रॉफ्ट यांनी संधी दिली आहे. या तिघांवर बॉल टेम्परिंग प्रकरणी बोर्डाने कारवाई करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असताना या तिघांनी चेंडूशी छेडछाड केल्याने त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. आता 16 महिन्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या या तिघांना चिडवण्याची संधी इंग्लंडच्या प्रेक्षकांनी सोडली नाही. वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर प्रेक्षकांनी सँडपेपर दाखवले. तर काही प्रेक्षकांनी स्मिथला चिडवण्यासाठी त्याच्या रडणाऱ्या चेहऱ्याचे मुखवटे घातले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England fans shows sandpaper and mask of crying Steve Smith