England India Test Match Concern Of Cocaine fueled fans anti social behavior
England India Test Match Concern Of Cocaine fueled fans anti social behavior esakal

इंग्लंड - भारत कसोटी सामन्यावेळी 'कोकेनची नशा' ठरणार डोकेदुखी?

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या 1 जुलैपासून एकमेव कसोटी सामना सुरू होत आहे. या सामन्याला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असणार यात शंका नाही. मात्र इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला एक वेगळीच चिंता सतावत आहे. त्यांना कोकेनच्या नेशेखाली काही फॅन्स काही समाजविघातक कृत्य तरी करणार नाहीत ना अशी चिंता वाटत आहे. (England India Test Match Concern Of Cocaine fueled fans anti social behavior)

England India Test Match Concern Of Cocaine fueled fans anti social behavior
आयर्लंडमधील दुसरा सामनाही रात्री जागवणार; काय सांगतोय हवामान विभाग?

टाईम्स वृत्तसमुहाने दिलेल्या वृत्तानुसार काही क्रिकेट अधिकाऱ्यांनी चाहत्यांचे मैदानावरील वागणुकीबाबत चिंता व्यक्त केली आहे. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर आता मैदानात चाहत्यांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र क्रिकेट अधिकाऱ्यांना काही फॅन्स दारू आणि अंमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे हिंसक आणि आक्रमक होण्याची शक्यता आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील गेल्या वर्षी लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या कसोटी सामन्यात काही चाहत्यांनी केएल राहुलच्या अंगावर बिअर आणि शॅम्पेन बॉटल्सचे कॉर्क्स फेकले होते. यावरून भारताचा त्यावेळीचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच भडकला होता. त्याने हेच क्रॉक्स पुन्हा चाहत्यांच्या अंगावर फेकण्यास सांगितले.

England India Test Match Concern Of Cocaine fueled fans anti social behavior
पंत परिपक्व नाही, त्याला कर्णधार करू नका : कनेरिया

नुकतेच हेडिंग्ले येथील इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान रविवारी चाहत्यांमध्ये हाणामारी झाली होती. इंग्लंड क्रिकेट्सचा अधिकृत फॅन ग्रुप बार्मी आर्मीने यानंतर जे कोणी या हिंसाचारात सहभागी होते त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले.

त्यामुळे गेल्या वर्षी पुरूष युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल सामन्यावेळी जी समस्या उद्भवली होती ती क्रिकेटच्या मैदानावर देखील उद्भवण्यांची भिती अधिकाऱ्यांना वाटत आहे. जास्तीजास्त कुटुंब आणि मुले सामना पाहण्यास यावीत असे इंग्लंड क्रिकेटला वाटते. अशा प्रकारच्या प्रवृत्ती या गोष्टीला हानिकारक असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com