वाढत्या वयात जिमी मोडणार सचिनचा विश्वविक्रम?

वाढत्या वयासोबत खेळाडूच्या कामगिरीचा आलेख हा खालवत असतो. पण इंग्लंडच्या जेम्स अँड्रसन याला अपवाद आहे. वाढत्या वयासोबत त्याच्या गोलंदाजीतील धार वाढतानाचे चित्र पाहायला मिळते.
james anderson sachin tendulkar
james anderson sachin tendulkare sakal

वाढत्या वयासोबत खेळाडूच्या कामगिरीचा आलेख हा खालवत असतो. पण इंग्लंडच्या जेम्स अँड्रसन याला अपवाद आहे. वाढत्या वयासोबत त्याच्या गोलंदाजीतील धार वाढतानाचे चित्र पाहायला मिळते. 10 जुलैला 39 वर्षांचा होणाऱ्या या गोलंदाजाला आता विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम खुणावत आहे. जेम्स अँड्रसनच्या नावे 160 कसोटी सामन्यात 614 विकेट आहेत. सहाशे बळींचा टप्पा पार करणारा तो एकमेव जलदगती गोलंदाज आहे. आगामी काळात अँड्रसन मायदेशात 7 कसोटी सामने खेळणार आहे. गोलंदाजीतील कामगिरीशिवाय त्याला आणखी काही खास विक्रम खुणावत आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या एक विश्वविक्रम मागे टाकण्याची त्याच्याकडे संधी आहे. वाढत्या वयात जिमी मोडणार सचिनचा विश्वविक्रम

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 94 सामने मायदेशातील मैदानात खेळले असून हा एक विश्वविक्रम आहे. जर इंग्लंडच्या संघाने रोटेशनल पद्धत बाजूला ठेवून आगामी काळात जेम्स अँड्रसनला अधिक सामन्यात खेळण्याची संधी दिली तर तो सचिनचा विश्वविक्रम मागे टाकू शकतो.

james anderson sachin tendulkar
IPL 2021... तर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना बसणार 41 कोटींचा फटका

अँड्रसनला सर्वच्या सर्व सात सामन्यात संघात संधी मिळाली तर सचिनचा विक्रम त्याच्या नावे होऊ शकतो. न्यूझीलंड विरुद्धच्या दोन्ही सामन्यांसह भारताविरुद्धच्या सर्व पाच सामन्यात खेळण्यास उत्सुक असल्याचे अँड्रसनने यापूर्वीच बोलून दाखवले. अँड्रसनने मायदेशात आतापर्यंत 89 कसोटी सामने खेळले आहेत. सात पैकी सात सामन्यात तो मैदानात उतरला तर त्याच्या नावे मायदेशात 96 कसोटी सामन्यांची नोंद होईल.

james anderson sachin tendulkar
धोनीने पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्यामागचे कनेक्शन?

मायदेशात सर्वाधिक कसोटी सामन्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने भारतात 94 कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्यापाठोपाठ या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा नंबर लागतो. त्याने मायदेशात 92 सामने खेळले आहेत. अँड्रसन, एलिस्टेअर कुक आणि आस्ट्रेलिया स्टीव वॉ यांनी मायदेशात 89 सामने खेळले आहेत. गोलंदाजीमध्ये मायदेशात 400 विकेट घेण्याचा पराक्रम आपल्या नावे करण्याचीही जेम्सला संधी आहे. यासाठी त्याला आणखी 16 विकेटची गरज आहे. मायदेशात खेळलेल्या 89 कसोटी सामन्यात जेम्स अँड्रसनने 384 विकेट घेतल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com