esakal | 'टीम इंडिया'चा दारूण पराभव करूनही इंग्लंडने बदलला उपकर्णधार, कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

england team

भारताचा दारूण पराभव करूनही इंग्लंडने बदलला उपकर्णधार, कारण...

sakal_logo
By
विराज भागवत

चौथ्या कसोटीसाठी मोईन अलीला केलं उपकर्णधार

England vs India Test: लीड्सच्या मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाला दारूण पराभूत केले. लॉर्ड्सवरील भारताने केलेल्या पराभवाची इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत व्याजासह परतफेड केली. भारतीय संघाने (Team India) अतिशय खराब कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ७८ धावांत संपला. त्यानंतर इंग्लंडने (England) दमदार फलंदाजी (Batting) करत ४३२ धावा कुटल्या आणि भारतावर ३५४ धावांची आघाडी (Lead) घेतली. या आघाडीचा पाठलाग करताना भारताचा संघ २७८ धावांवर बाद झाला. त्यामुळे एक डाव व ७६ धावांनी सामना गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवली. भारताचा दणदणीत पराभव करूनही इंग्लंडने चौथ्या सामन्यासाठी संघाचा उपकर्णधार बदलल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा: IND vs ENG Test: "तर भारतीय संघ मालिकेत ३-०ने आघाडीवर असता"

इंग्लंडचा उपकर्णधार-यष्टीरक्षक जोस बटलर याला कसोटी मालिकेच्या उर्वरित सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. जोस बटलरने त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी पत्नीसोबत राहण्यासाठी पितृत्व रजा घेतली आहे. त्यामुळे त्याच्या जागी फिरकीपटू मोईन अलीला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मोईन अलीने इंग्लंडकड़ून खेळताना ६३ कसोटी सामन्यात ५ शतकांसह २ हजार ८७९ धावा केल्या आहेत. तसेच, १९३ गडी बाद केले आहेत.

दुखापतग्रस्त मार्क वूड हा चौथ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर ख्रिस वोक्सदेखील चौथ्या कसोटीत पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: "हे विसरू नका की याच टीम इंडियाने...", हुसेनचा इंग्लंडला इशारा

हेडिंग्ले लीड्सच्या मैदानात टॉस जिंकून विराटने पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला. पण भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत आटोपला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावा केल्या. इंग्लंडकडून जो रुटने १२१ धावांची खेळी केली. ३५४ धावांचे आव्हान भारताला पार करता आले नाही. पुजाराच्या ९१ धावांमुळे भारताला २७८ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारताला एक डाव आणि ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

loading image
go to top