IND vs ENG Test: "तर भारतीय संघ मालिकेत ३-०ने आघाडीवर असता"

Team-India
Team-India

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचं मोठं विधान, वाचा सविस्तर...

Ind vs Eng Test: पहिला सामना अनिर्णित राहिल्यावर आणि दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने तिसरा सामना सहज गमावला. भारतीय संघाने (Team India) तिसऱ्या कसोटीत अतिशय खराब कामगिरी केली. भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांत संपला. इंग्लंडने (England) आपल्या पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत भारतावर ३५४ धावांची आघाडी (Lead) घेतली. ही आघाडी भारताला झेपली नाही. भारताचा संघ २७८ धावांवर माघारी परतला. इंग्लंडकडून फलंदाजीची आघाडी सांभाळली ती जो रूटने. कर्णधारपदाला साजेसा खेळ करणाऱ्या रूटने तीन सामन्यात तीन शतके झळकावली. या मालिकेसंदर्भात ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजा याने मोठे विधान केले.

Team-India
आफ्रिकेची 'स्टेन'गन कायमची थंडावली... निवृत्तीची केली घोषणा!

जो रूट सध्या तुफान फॉर्मात आहे. रूट एक प्रतिभावान फलंदाज आहे यात वादच नाही. त्याने आपली कामगिरी आतापर्यंत चोख पार पाडली आहे. दीर्घकाळ जो रूट हा आघाडीच्या फलंदाजांपैकी एक आहे. भारतीय संघाला काहीही करून जो रूटला झटपट बाद करण्याची एखादी शक्कल शोधणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला जो रूट हाच भारत आणि विजयाच्या मधील अडसर आहे. जर जो रूट इंग्लंडच्या संघात नसता, तर भारतीय संघ आता मालिकेत ३-०ने आघाडीवर असता", असं मोठं विधान ख्वाजाने आपल्या युट्यूब चॅनेलवरून केलं.

Team-India
सिक्सर मारेन अन् बघणारही नाही.... फ्लेचरचा No Look SIX पाहाच

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या खराब फॉर्मबद्दलही ख्वाजाने आपलं मत मांडलं. विराटच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय किकेटमध्ये ७० शतके आहेत. परंतु, २०१९पासून त्याने वन डे, कसोटी किंवा टी२० मध्ये एकही शतक झळकावलेलं नाही. त्याबाबत ख्वाजाने मत मांडलं. "विराटचे ७१वे शतक लवकरच होईल. सध्याच्या मालिकेत विराटला चांगली सुरूवात मिळते आहे. त्याने ४०-५० धावांच्या खेळी केल्या आहेत. प्रश्न फक्त इतकाच आहे की जसे जो रूट आपल्या संघासाठी धावांचा रतीब घालतोय, तसा खेळ विराट करू शकेल का? साऱ्यांचेच याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्याच्यावर सध्या प्रचंड दडपण आहे. अशा वेळी विराटने या अडथळ्यांचा योग्य प्रकारे सामना करावा आणि टीकाकारांना दमदार उत्तर द्यावं, असं मला वाटतं", अशा शब्दात त्याने विराटबद्दलचं आपलं मत व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com