England T20 World Cup Squad : इंग्लंडचा संघ जाहीर! जेसन रॉयला डच्चू, मुंबईच्या आर्चरलाही नाही स्थान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

England T20 World Cup Squad Announce Jason Roy Jofra Archer Not Included

England T20 World Cup Squad : इंग्लंडचा संघ जाहीर! जेसन रॉयला डच्चू, मुंबईच्या आर्चरलाही नाही स्थान

England T20 World Cup Squad : इंग्लंडने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी आपला 15 जणांचा संघ जाहीर केला. याचबोरबर तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे. या संघात धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्थान मिळालेले नाही. मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला 8 कोटी रूपये देऊन विकत घेतले होते. (England T20 World Cup Squad Announce Jason Roy Jofra Archer Not Included)

हेही वाचा: PAK vs HK : Naseem Shah झाला फिट! अशी आहे पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन

ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. वर्ल्डकप 29 दिवस सुरू राहील. अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपची चाहते चातकासारखी वाट पाहत आहेत. इंग्लंडने टी 20 वर्ल्डकप बरोबरच पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेसाठी देखील आपला संघ जाहीर केला. ही मालिका 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. यानंतर इंग्लंड संघ 9 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाबरोबर टी 20 मालिका खेळणार आहे.

जेसन रॉयला खराब फॉर्ममळे मिळाला डच्चू

जेसन रॉय गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. त्याला द हंड्रेड स्पर्धेत देखली फारशी चमक दाखवता आली नव्हती. गेल्या वर्षीचा टी 20 वर्ल्डकप 2021 युएईमध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर रॉयने 11 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने फक्त 206 धावा केल्या आहेत. दुसरीकडे जोफ्रा आर्चर अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. या दुखापतीमुळेच त्याला संघात स्थान मिळालेले नाही.

हेही वाचा: Dhanashree Verma : युझवेंद्रची पत्नी धनश्री रूग्णालयात दाखल! चाहत्यांसाठी दिला खास संदेश

इंग्लंडचा टी 20 वर्ल्डकप, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील संघ :

जॉस बटलर, मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रुक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशिद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.

स्टँडबाय खेळाडू :

टायमर मिल्स, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन

Web Title: England T20 World Cup Squad Announce Jason Roy Jofra Archer Not Included

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..