ऍशेस कसोटी : इंग्लंडला मोलाची आघाडी; बर्न्सचे शतक

वृत्तसंस्था
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने 4 बाद 267 धावा केल्या होत्या. शनिवारी बर्न्स 125 धावांत केवळ आठ, तर स्टोक्‍स 38 धावांत 12 धावांची भर घालून परतले. कमिन्सने स्टोक्‍सला यष्टीमागे झेल देण्यास भाग पागडेल.

बर्मिंगहॅम : पहिल्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने तळातून प्रतिकार झाल्यामुळे ऑस्ट्रेलियावर 90 धावांची मोलाची आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला डाव 374 धावांत संपला.

दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने 4 बाद 267 धावा केल्या होत्या. शनिवारी बर्न्स 125 धावांत केवळ आठ, तर स्टोक्‍स 38 धावांत 12 धावांची भर घालून परतले. कमिन्सने स्टोक्‍सला यष्टीमागे झेल देण्यास भाग पागडेल.

टिच्चून अचूक मारा करणाऱ्या लायनला अखेर आज विकेट मिळाली. त्याने बर्न्सला यष्टीमागे झेलबाद केले. 105व्या षटकात पहिल्याच चेंडूवर हा धक्का दिल्यानंतर त्याने अखेरच्या चेंडूवर मोईन अलीला शून्यावर त्रिफळाबाद केले. पुढील षटकात बेअरस्टॉला सीड्‌लने बाद केले. 8 बाद 300 स्थितीस अशा स्थितीस कांगारूंना संधी होती, पण वोक्‍स आणि ब्रॉड यांनी 65 धावांची भर घातली. जायबंदी अँडरसनसुद्धा फलंदाजीस उतरला.

संक्षिप्त धावफलक ः 
ऑस्ट्रेलिया ः पहिला डाव ः 284 
इंग्लंड ः पहिला डाव ः 135.5 षटकांत सर्व बाद 374 (रॉरी बर्न्स 133-312 चेंडू, 17 चौकार, ज्यो रूट 57, बेन स्टोक्‍स 50-96 चेंडू, 3 चौकार, जॉनी बेअरस्टॉ 8, ख्रिस वोक्‍स नाबाद 37-95 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, स्टुअर्ट ब्रॉड 29-67 चेंडू, 2 चौकार, पॅट कमिन्स 3-84, जेम्स पॅट्टीसन 2-82, पीटर सीड्‌ल 2-52, नेथन लायन 3-112) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England takes lead against Australia in Ashes test