Mohammed Shami : शमीने कर्णधार बटलरची शिकार करत केला मोठा विक्रम

England Vs India 1st ODI Mohammed Shami Became fastest Indian to reach 150 ODI Wicket the mark
England Vs India 1st ODI Mohammed Shami Became fastest Indian to reach 150 ODI Wicket the markesakal
Updated on

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात (England Vs India 1st ODI) जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने (Mohammed Shami) भादक मारा करत इंग्लंडला 110 धावात गुंडाळले. बुमराहने 6 तर शमीने 3 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे आजच्या सामन्यात मोहम्मद शमीने एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला. त्याने 30 धावा करून एकाकी झुंज देणाऱ्या जॉस बटलरला बाद करत आपला वनडेमधला 150 वा बळी टिपला. (Fastest Indian to Reach 150 ODI Wicket)

England Vs India 1st ODI Mohammed Shami Became fastest Indian to reach 150 ODI Wicket the mark
ENG vs IND 1st ODI : रोहितचे दमदार अर्धशतक; भारताचा मोठा विजय

जसप्रीत बुमराहने इंग्लंडला पाठोपाठ धक्के द्यायला सुरूवात केल्यानंतर दुसऱ्या बाजूने मोहम्मद शमीने देखील भेदक मारा केला. त्याने बेन स्टोक्सला शुन्यावर बाद करत सामन्यातले आपले विकेटचे खाते उघडले. त्यानंतर त्याने डाव सावरू पाहणाऱ्या कर्णधार जॉस बटलरला बाद करत आपला 150 वा वनडे बळी टिपला. शमी येथेच थांबला नाही. त्याने क्रेग ओव्हरटर्नला देखील बाद करत सामन्यातील आपली तिसरी विकेट घेतली.

England Vs India 1st ODI Mohammed Shami Became fastest Indian to reach 150 ODI Wicket the mark
Rohit Sharma : रोहितच्या रडारवर विल्यमसन, पॉटिंगचे रेकॉर्ड

31 वर्षाच्या मोहम्मद शमीने 80 वनडे सामन्यात 150 विकेट घेण्याचा विक्रम केला. त्याने सर्वात वेगाने 150 विकेट घेण्याचा अजित आगरकरचे (97 वनडे) रेकॉर्ड मोडले. याचबरोबर सर्वात वेगवान 150 वनडे विकेट घेणाऱ्याच्या जागतिक यादीत तो राशिद खान सोबत संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला. या यादीत मिचेल स्टार्क (77 वनडे) पहिल्या तर पाकिस्तानचा शकलेन मुश्ताक (78 वनडे) दुसऱ्या स्थानावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com