IND vs ENG 3rd Test Day 3 : दिवसाअखेर पुजारा-कोहली नाबाद

टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी किंग कोहली आणि पुजाराच्या खांद्यावर आहे.
IND vs ENG
IND vs ENGTwitter

England vs India 3rd Test : सलामीवीर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अर्धशतकानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहलीने (Virat Kohli ) इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी 99 धावांची भागीदारी केलीये. अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला त्यावेळी चेतेश्वर पुजारा 180 चेंडूत 15 चौकाराच्या मदतीने 91 धावांवर खेळत होता.

दुसऱ्या बाजूला कर्णधार विराट कोहली 94 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 45 धावा केल्या होत्या. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील विराट कोहलीची ही सर्वोच्च धावसंख्या असून ही खेळी पुढे नेत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी किंग कोहली आणि पुजाराच्या खांद्यावर आहे. भारतीय संघ अजूनही 139 धावांनी पिछाडीवर आहे.

IND vs ENG
रोनाल्डो पुन्हा 'मँचेस्टर युनायटेड'मध्ये; युव्हेंटसला सोडचिठ्ठी

इंग्लंडच्या संघाचा डाव 432 धावांत आटोपल्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या जोडीनं भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. भारताच्या धावफलकावर अवघ्या 34 धावा असताना लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. त्याने 54 चेंडूचा सामना करुन केवळ 8 धावांची भर घातली. त्यानंतर रोहितने पुजाराच्या साथीने डावाला आकार दिला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. रोहित शर्मा मोठ्या खेळीकडे वाटचाल करत असताना ओली रॉबिन्सनच्या चेंडूवर त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. रोहितच्या पायचितवरुन नव्या वादालाही तोंड फुटले आहे.

IND vs ENG
INDvsENG: एक दोन तीन चार, टीम इंडियाच्या 'हिटमॅन'चा जयजयकार!

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत संघर्ष करत असलेल्या विराट कोहलीने त्याची जागा घेतली. विराटला चांगली सुरुवात मिळाली आहे. दुसरीकडे पुजारा 50 हून अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा करत आपल्यात गियर बदलून खेळण्याची क्षमताही असल्याचे दाखवून दिले. भारतीय संघाची सर्व मदार आता या जोडीवर आहे. पुजारा आणि विराट चौथ्या दिवशी कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

IND vs ENG
CPL : 1-6-6-1-6-4-6-6-6-0-4-4 मसल पावर रसेलची विक्रमी फिफ्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com