esakal | IND vs ENG Day 4 : दोन्ही संघांसाठी विजयाची समान संधी
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

IND vs ENG Day 4 : दोन्ही संघांसाठी विजयाची समान संधी

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India, 4th Test Day 4 : ; इंग्लंड आणि टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या निकालासाठी पाचव्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. पहिल्या डावात दोनशेच्या आत गुंडाळलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात चारशे पार धावा करुन यजमान इंग्लंडसमोर मोठी धावसंख्या ठेवली आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडनेही दुसऱ्या डावाला दमदार सुरुवात केली. दिवसाअखेर कोणतीही पडझड न करु देता सलामीवीर रॉरी बर्न्स 31 (109) आणि हमीद 43 (85) नाबाद माघारी फिरले. या जोडीच्या संयमी खेळीच्या जोरावर चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने बिन बाद 77 धावा केल्या आहेत.

सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी इंग्लंडला अजूनही 291 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे भारताला शेवटच्या दिवशी 10 विकेट घ्याव्या लागतील. दोन्ही संघांसाठी विजयाची समान संधी आहे. सलामीवीर रोहित शर्माच्या शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या आश्वासक अर्धशतकी खेळीनंतर शार्दूल ठाकूर आणि रिषभ पंतने अर्धशतके झळकावली. त्यांच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडसमोर 368 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. इंग्लंडकडून क्रिस वोक्स याने सर्वाधिक 3, रॉबिन्सन आणि मोईन अलीने 2-2 तर अँडरसन, ओव्हरटन आणि जो रूटने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

हेही वाचा: भारतीय फलंदाजांनी केली इंग्लंडची धुलाई; दिलं डोंगराएवढं आव्हान

टीम इंडियाने पहिल्या डावात 191 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करत 99 धावांची आघाडी घेतली. पण भारतीय संघाने दमदार कमबॅक करत आता इंग्लंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या ठेवली आहे. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पहिल्या सत्राच्या खेळावर सामन्याचा कल नक्की कोणाच्या बाजूनं झुकणार हे स्पष्ट होईल. जो संघ अखेरच्या दिवशी पहिले सत्र गाजवेल त्याला सामना जिंकण्याची संधी अधिक असेल. जर दोन्ही संघाकडून समतोल खेळ झाला तर सामना अनिर्णित राहू शकतो.

हेही वाचा: अर्धशतक शार्दूलचं अन् चर्चा हार्दिकची; नक्की झालं तरी काय?

loading image
go to top