Ind vs Eng : एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडकडून भारतीय प्रेक्षकांना वर्णद्वेशावरून टिप्पणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 england vs india test edgbaston officials

एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडकडून भारतीय प्रेक्षकांना वर्णद्वेशावरून टिप्पणी

IND vs ENG : टीम इंडिया सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन संघांमधील पाचवा कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी स्टँडमध्ये बसलेल्या काही भारतीय प्रेक्षकांना इंग्लंडच्या चाहत्यांकडून वाईट वागणूक मिळाली. भारतीय चाहत्यांवर वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. असा आरोप भारताच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

हेही वाचा: कोविडमधून बरे झाल्यानंतर Rohit Sharma नेटमध्ये गाळत आहे घाम - पाहा Video

एका युजरने ही घटना सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ही गोष्ट समोर आली आहे. त्याने लिहिले की, स्टँडवर असलेल्या भारतीय चाहत्यांशी थेट वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या जात आहे. एजबॅस्टनच्या अधिकाऱ्यांना हे कळताच त्यांनी चाहत्यांची माफी मागितली आणि चौकशी करण्यास सांगितले. एजबॅस्टनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, आम्ही एजबॅस्टनमध्ये सर्वांसाठी सुरक्षितचे वातावरण निर्माण करत आहोत, अशा प्रतिक्रिया ऐकून आम्हाला धक्का बसला. ट्विटनंतर मी त्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या बोललो आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

एजबॅस्टन कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावा आणि दुसऱ्या डावात 245 धावा केल्या. तर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 284 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 378 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 259 धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 119 धावांची गरज आहे.

Web Title: England Vs India Test Edgbaston Officials Investigate Racism At Ind Vs Eng Test Match Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..