
कोविडमधून बरे झाल्यानंतर Rohit Sharma नेटमध्ये गाळत आहे घाम - पाहा Video
rohit sharma : भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्मासह सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे १ जुलैपासून कसोटी सामना खेळला जात आहे. ही कसोटी सुरू होण्यापूर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह आला होता त्याला काही दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यामुळे तो कसोटी सामना खेळू शकला नाही. पण आता तो कोविडमधून बरा झाला आहे. रोहित शर्माच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो नेट सेशनमध्ये घाम गाळत आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर सराव करताना दिसत आहे. त्यादरम्यान तो खूप चांगल्या मूडमध्ये दिसत आहे, आणि जोरदार सराव करत आहे. इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका 7 जुलैपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये भारतीय संघ वनडे आणि टी-20 सामने खेळणार आहे.
हेही वाचा: PCB : रमीझ राजांच्या 'बुलेटप्रूफ' कार वापराबाबत संसदीय समितीकडून विचारणा
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाला तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. 7 जुलै रोजी पहिला टी-20 सामना खेळायचा आहे. दुसरा सामना बर्मिंगहॅम येथे आणि तिसरा टी-२० सामना ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळवला जाईल. त्यानंतर लंडनमध्ये पहिला वनडे, लॉर्ड्सवर दुसरा वनडे आणि मँचेस्टरमध्ये 12 जुलैला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे.
पहिल्या टी-20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 साठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जॅस्पीनो बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान आणि उमरान मलिक.
वनडे मालिकेसाठी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रणंद कृष्णा, मोहम्मद शमी, शमी मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
Web Title: Rohit Sharma Profusely Net Session After Recovering Covid Bcci Shared Ind Vs Eng
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..