FIFA World Cup 2022 : इंग्लंडची सलामीची लढत आशिया खंडातील दादा इराण संघाशी

आज इंग्लंड-इराण संघांची सलामीची लढत
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022sakal

FIFA World Cup 2022 : २०१८ मधील विश्‍वकरंडकात उपांत्य फेरीत प्रवेश करणारा आणि युरो करंडकात अंतिम फेरीत धडक मारणारा इंग्लंडचा संघ आजपासून यंदाच्या फुटबॉल विश्‍वकरंडकाच्या आव्हानाला सुरुवात करील. इंग्लंडला सलामीच्या लढतीत आशिया खंडातील दादा संघ इराणशी दोन हात करावे लागतील. या लढतीत इंग्लंडचा संघ निर्णायक विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल.

इंग्लंडचा संघ पुन्हा एकदा गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलच्या रणांगणात उतरणार आहे. हॅरी केन हा त्यांचा प्रमुख खेळाडू असणार आहे. मागील विश्‍वकरंडक व युरो करंडक या दोन्हींमध्ये त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. रशियामध्ये झालेल्या विश्‍वकरंडकात त्याने सर्वाधिक ६ गोल करीत गोल्डन बुट हा प्रतिष्ठेचा करंडकही पटकावला होता. युरोपियन पात्रता फेरीच्या लढतींमध्येही त्याने सर्वाधिक १२ गोल करीत आपली चुणूक दाखवली होती.

आशियातील बलाढ्य संघ

इंग्लंडचा संघ फिफा क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे साहजिकच उद्याच्या लढतीत त्यांचे पारडे जड असेल यात शंका नाही; पण इराणचा संघ हा फिफाच्या क्रमवारीत २०व्या स्थानावर आहे. आशिया खंडातील अव्वल संघ म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. आशियाई खंडातील पात्रता फेरीच्या लढतींपैकी त्यांनी दहापैकी आठ सामनेही जिंकले आहेत. तसेच या दरम्यान प्रतिस्पर्ध्यांना फक्त चारच गोल करता आले.

क्वेरोज यांचा प्रशिक्षकपदाचा चौकार

इराण संघाद्वारे ड्रॅगन स्कोचिच यांना प्रशिक्षकपदावरून काढून त्यांच्याऐवजी कार्लोस क्वेरोज यांना संधी देण्यात आली. प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्याची विश्‍वकरंडकातील ही त्यांची सलग चौथी खेप आहे. याआधी त्यांनी २०१०मध्ये पोर्तुगालला व २०१४ व २०१८मध्ये इराणला प्रशिक्षण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com