IndW vs EngW : भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी; इंग्लंडने मालिकेत घेतली 1-0 ने आघाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Women vs England Women 1st T20I:

IndW vs EngW : भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी; इंग्लंडने मालिकेत घेतली 1-0 ने आघाडी

India Women vs England Women 1st T20I : भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिका खेळण्यासाठी गेली आहे. टीम इंडियाची मालिकेची सुरुवात खूपच खराब झाली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाचा 9 गडी राखून पराभव केला. चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमध्येही अत्यंत खराब पाहायला मिळाले.

हेही वाचा: India Legends ची विजयी सुरुवात; स्टुअर्ट बिन्नीने ठोकले अर्धशतक

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देताना स्मृती मानधना (23) आणि शेफाली वर्मा (14) यांनी पहिल्या विकेटसाठी 4 षटकांत 30 धावा जोडल्या होत्या. पॉवरप्लेमध्ये भारताने या दोन खेळाडूंच्या विकेट्स गमावून 47 धावा केल्या होत्या. मधल्या फळीतील फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही. यादरम्यान कर्णधार हरमनप्रीतने 20 धावांची खेळी केली. शेवटी, दीप्ती आली आणि 24 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 29 धावा करत भारताची धावसंख्या 132 पर्यंत नेली. इंग्लंडकडून साराने 4 बळी घेतले.

हेही वाचा: Virat Kohli : 'खाओ पियो ऐश करो...' विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो व्हायरल

भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांची इंग्लंडने धुव्वा उडवली. सोफिया डंकलेने 44 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 61 धावांची खेळी केली, तर एलिस कॅप्सीही 20 चेंडूत नाबाद 32 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. इंग्लंडला एकमेव धक्का स्नेह राणाने 24 च्या वैयक्तिक स्कोअरवर डॅनिएल व्याटला बाद करून दिला. रेणुका सिंग (5.80) वगळता प्रत्येक भारतीय गोलंदाजाने 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी धावा केल्या. मालिकेतील पुढील सामना 13 सप्टेंबर रोजी डर्बी येथील काउंटी मैदानावर खेळवला जाईल. इंग्लंडने पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली

Web Title: England Women Beat India Women Team 1st T20i Smriti Mandhana Ind Vs Eng Women Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..