Virat Kohli : 'खाओ पियो ऐश करो...' विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohli : 'खाओ पियो ऐश करो...' विराट कोहलीचा लहानपणीचा फोटो व्हायरल

Virat Kohli Childhood Picture Viral : आशिया कप 2022 मधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. भारताने अफगाणिस्तानविरुद्धचा सामना 101 धावांनी जिंकून संघाचा निरोप घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी तयारीला सुरुवात केली. आगामी T20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

विराट कोहलीने आशिया कप-2022 च्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे 71 वे शतक होते, ज्याची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. विराट कोहलीने शनिवारी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या बालपणीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. जो खूप पसंत केला जात आहे.

हेही वाचा: Marcus Stoinis Injury : भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, स्टोयनिस-वॉर्नर बाहेर

विराटने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे स्वतःचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर त्यांनी लिहिले, खाओ, पीओ ऐश करो मित्रो.. दिल पर किससे दा दुखाओ ना.. ही एका पंजाबी गाण्याची ओळ आहे. फोटोमध्ये विराट जेवणाचे ताट घेऊन दिसत आहे, जो त्याच्या बालपणातील एका पार्टीदरम्यानचा फोटो आहे.

हेही वाचा: Naseem-Urvashi : उर्वशीबद्दल पाकिस्तानी क्रिकेटरचे स्पष्टीकरण; म्हणाला 'माझं अन् तिचं...'

जवळपास तीन वर्षांपासून सुरू असलेला शतकाचा दुष्काळ विराटने नुकताच संपवला. पण 70 व्या शतकापासून ते 71 व्या शतकापर्यंतचा प्रवास कोहलीसाठी सोपा नव्हता. अफगाणिस्तानविरुद्ध विराटने अप्रतिम फलंदाजी करत 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 122 धावा केल्या. विराटला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. विराट कोहलीच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 71 शतके आहेत. सचिनने 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. विराटने आतापर्यंत कसोटीत 27, वनडेमध्ये 43 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये एक शतक केले आहे.

Web Title: Virat Kohli Shared Childhood Picture On Social Media During Program Viral Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..